सोमवारी विश्व हिंदू परिषदेची बैठक 

सोमवारी, विश्व हिंदू परिषदच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाची बैठक तिरुपती येथे बोलावण्यात आलेली आहे.
सोमवारी विश्व हिंदू परिषदेची बैठक 

२२ सप्टेंबर २०२४, नवी दिल्ली : सोमवारी, विश्व हिंदू परिषदच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाची बैठक तिरुपती येथे बोलावण्यात आलेली आहे.'आंध्र प्रदेश आणि तेलंगाना येथील पूज्य संतांची ही बैठक हिंदू समाजासमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांची आणि त्यावरील उपाययोजनांची चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.' असे विहिपचे आंतरराष्ट्रीय महासचिव श्री बजरंग बागडा यांनी माहिती देताना सांगितले. या बैठकीत तिरुपती प्रसादम् विषयी संतांनी प्रस्ताव पारित करण्याची शक्यता आहे

श्री बागडा यांनी सांगितले की, या बैठकीत हिंदू समाजासमोर विविध आव्हानांची चर्चा केली जाईल आणि संतांची भूमिका कशाप्रकारे महत्वाची आहे याबाबत काही निर्णय घेतले जातील. तसेच, तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाबद्दल जो गोंधळ आणि चिंताजनक बातम्या हिंदू समाजाला व्यथित करीत आहेत, त्याबद्दलही निश्चितपणे चर्चा होईल. यासंबंधी पूज्य संतांची भूमिका आणि त्यांच्या नेतृत्वात पुढील कार्यक्रम कसा असावा याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version