जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ही जोडी प्रेक्षकांना एकत्र पहायला खुप आवडते. या जोडीला लग्नानंतर खूप कमीवेळा एकत्र पहायला मिळालं आहे. विराट आपल्या क्रिकेटमध्ये, तर अनुष्का आपल्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असते.
मात्र आता या दोघांनी एकत्र जिम करतानाचा एक गमतीदार व्हिडीओ विराटने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. विराटसोबत अनुष्काही जिममध्ये दिसत असून, अनुष्काने वर्कआऊटला सुरुवात केल्यानंतर विराटने हा क्षण आपल्या फोनमध्ये शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये विराट अनुष्काचं कौतुक करताना दिसत आहे तर अनुष्का विराटला रबिश म्हणत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.