जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
11 डिसेंबर 2017 रोजी विवाहबंधनात बांधले गेलेले तसेच प्रेक्षकांची आवडती जोडी म्हणुन ओळखले जाणारे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच सर्वांच्या चर्चेत असतात. नुकताच विराटने अनुष्का सोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून सोशल मीडियावर सध्या याच फोटोची जोरदार चर्चा सुरु आहे.
या फोटोतून अनुष्का पुन्हा एकदा विराटच्या प्रेमात पडल्याचे दिसून येते. अनुष्कासोबतच्या फोटोला पाहुन ‘मी आणि माझी एकमेव’ असं विराटने म्हटले असून सध्या हा फोटो अनेकांचे लक्ष वेधून घेत असल्याचे कळते. विराट हा सध्या साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर तर अनुष्का शर्मा तिच्या आगामी ‘सूई धागा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त जरी असली तरी हे दोघेही आपापल्या कामकाजातून वेळ काढून सोशल मीडियावर सतत आपले फोटो शेअर करत असतात.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.