तृतीयपंथीयांचा वेष घेऊन सर्वसामान्यां लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

तृतीयपंथीयांचा वेष घेऊन सर्वसामान्यां लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

जय महाराष्ट्र न्यूज, विरार

 

कधी सिग्नलवर तर कधी रस्त्यावर तृतीयपंथीयांचा सर्वसामान्यांशी संबंध येतो. अनेकदा हे तृतीयपंथी जबरदस्तीनं सर्वसामान्यांकडून पैसे उकळतात असा आरोपही होतो. त्यामुळे अनेकदा लोकं त्यांच्या वाटेला जात नाहीत. पण याचाच गैरफायदा घेत तृतीपपंथीयांचा वेष घेत लोकांना लुटणाऱ्या टोळीचा सर्वसामान्यांनी पर्दाफाश केला आहे.

 

तृतीयपंथीयांचा वेष घेत चोरी करणारी टोळीच पकडण्यात आली आहे. भीक मागायच्या नावाखाली हे लोकांच्या घरात घुसत कपडे मोबाईल तसंच भांडी दागिने चोरायचे असा आरोप त्यांच्यावर आहे. यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. हे सर्व पुरुष असून आता त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्यांनी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version