Virar: क्षणात झालं होत्याचं नव्हतं; स्विमिंग पूलमध्ये बुडून 13 महिन्याच्या चिमुरड्याचा मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद

स्विमिंग पूलच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या लाइफगार्डच्या मुलाचाच बुडून मृत्यू झाल्याने सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे.
Virar: क्षणात झालं होत्याचं नव्हतं; स्विमिंग पूलमध्ये बुडून 13 महिन्याच्या चिमुरड्याचा मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद

विरार पश्चिमेतील अर्नाळा-कलंब बीच परिसरातील तुलसी फार्म हाऊस रिसॉर्टमध्ये शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत 13 महिन्यांच्या चिमुकल्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत बालकाची ओळख आयुष इभाड (वय १३ महिने) अशी असून तो रिसॉर्टमध्ये लाइफगार्ड म्हणून कार्यरत असलेल्या दशरथ इभाड यांचा मुलगा होता. विशेष म्हणजे, स्विमिंग पूलच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या लाइफगार्डच्या मुलाचाच बुडून मृत्यू झाल्याने सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे.

 समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (२९ मे) रोजी सायंकाळी सुमारे5 वाजण्याच्या सुमारास रिसॉर्टमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे सर्व कर्मचारी आपल्या कामात व्यस्त होते. आयुषची आई रिसॉर्टच्या किचनमध्ये काम करत असल्याने तिने काही वेळ मुलाला त्याच्या वडिलांकडे सोपवले होते. दरम्यान, दशरथ इभाड हे पर्यटकांच्या देखरेखीसाठी गेले. त्यांना वाटले की, मुलाची आई त्याला सोबत घेऊन गेली आहे.

हेही वाचा – Pune Pimpri-Chinchwad Liquor Case: पुणे पिंपरी-चिंचवड विषारी दारू प्रकरण! मृतांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत? 

मात्र 10- 15 मिनिटांनंतर आयुष दिसत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला. त्यावेळी तो रिसॉर्टच्या स्विमिंग पूलमध्ये आढळून आला. त्याला तातडीने पाण्याबाहेर काढून निर्मळ येथील सदानंद रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर नातेवाईक व रिसॉर्ट व्यवस्थापनाने आयुषला वसई पश्चिम येथील कार्डिनल रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर सायंकाळी 5 वाजण्यापूर्वीच त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून नेमका अपघात कसा घडला तसेच सुरक्षाव्यवस्थेत काही त्रुटी होत्या का, याचा तपास सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version