हुंड्यासाठी घरातील दोन्ही सुनांना अडीच लाखात विकल्याची धक्कादायक घटना

हुंड्यासाठी घरातील दोन्ही सुनांना अडीच लाखात विकल्याची धक्कादायक घटना

आपला समाज नक्की कुठल्या पातळीवर चाललाय असा विचार करायला लावणारी एक धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे.

विरार येथे एकाच घरातील 2 सुनांचा हुंड्यासाठी अतोनात छळ करून शेवटी सासु सासऱ्यानेच अडीच लाखात विकुन टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे, ज्या देशात स्त्रियांना सन्मान देण्याची संस्कृती आहे तिथेच सुनांना अशा पद्धतीने विकणे ही निंदास्पद बाब आहे, त्यामुळे अशा लोकांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.  

काय आहे नेमकं प्रकरण

  • सदर घटना विरार पश्चिमेतील एम.बी इस्टेटच्या सुमन कॉम्पलेक्समध्ये राहणाऱ्या 2 रावळ कुटुंबांची आहे.
  • रावळ कुटुंबीयांनी या सख्या 2 बहिणींचे हुंड्याकरिता आतोनात हाल केले.
  • रावळ कुटूंबाने आपल्या 2 मुलांसोबत या बहिणींच लग्न लावून दिलं होतं.
  • लग्न झाल्यानंतर 6 महिने सगळं काही सुरळीत चाललं होतं मात्र त्यानंतर रावळ कुटुंबाचा रावणपणा जागा झाला आणि या सख्या बहिणींवर हुंड्यापाई दुःख, त्रास, छळाचे सावट उमटू लागले.
  • या दोन्ही मुलींचा हुंड्याकरीता गेले अडीच वर्षे छळ सुरू होता.
  • मुलींच्या माहेरवरून जवळपास चौदा-पंधरा लाख रूपये उकळल्यावर सासरच्यांचे समाधान न झाल्याने अजून 4 लाख रूपयांची मागणी केली होती.
  • ही मागणी पुर्ण करण्यात मुलींचे आई-वडील असमर्थ ठरल्याने त्यांचा विरार येथे आतोनात छळ सुरु केला.
  • त्यानंतर सासरच्यांनी त्या दोघींना राजस्थान येथील विरवाडा या गावाला नेऊन मुलाकडच्या नातेवाईकांनी जाळून मारण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
  • त्यानंतर या मुलींना अनोळखी व्यक्तीबरोबर मुंबईला पाठवण्यात आले होते तर त्या व्यक्तीसोबत नुसतंच पाठवण्यात आलं नव्हतं तर या 2 बहिणींची त्या इसमाला हुंड्यापाई अडीच लाखात विक्री करण्यात आली.
  • या संपूर्ण प्रकाराबाबत जेव्हा या बहिणीने पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा या रावळ समाजाच्या जातपंचायत अध्यक्षांनी त्यांना धमकी दिली की ‘जर का तुम्ही तक्रार करून समाजाचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या माहेरच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात येईल आणि तुमच्या भावंडांची लग्नसुद्धा आम्ही होऊ देणार नाही.’

सदर प्रकरण पालघर जिल्हा महिला आणि बालकल्याण विकास विभागाकडे गेल्यावर यादव साहेब यांनी याप्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून दोन्ही मुलींचे जाबजबाब नोंद केले.

त्यानंतर पालघर जिल्हा पोलिस अधिक्षक गौरव सिंग यांनी या मुलींची संपूर्ण कहाणी समजून विरार पोलिस स्टेशनमधील पोलिस निरीक्षक यांना उचित कारवाई करण्यास सांगितले, त्या अनुषंगाने योग्य ती चौकशी करुन गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

या बहिणींसोबत घडलेल्या प्रकाराला सोसायटीमधील काही महिला रहिवाशांनी निषेध व्यक्त केला आहे तसेच या महिला रहिवाशी दोघी बहिणींना दिलासा देत त्यांना मदत देखील करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version