तहानलेलं विरार, सुविधा पुरवण्याच्या नावाखाली खोटी आश्वासने

तहानलेलं विरार, सुविधा पुरवण्याच्या नावाखाली खोटी आश्वासने

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

वसई विरार महानगर पालिकेच्या नालासोपारा शहर मधील काही ठिकाणी काही लोक वस्तीत नागरिक तासन तास पाण्याची वाट पाहत बसतात. पण, पाणी काही त्यांच्या अपेक्षा महापालिका पूर्ण करत नाही. आणि धक्कादायक बाब म्हणजे टँकर चालक पालिकेच्या पाइपलाईन मधून पाणी चोरी करतात तोच पाणी नागरिकांना मोठ्या किमतीत विकतात पण मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हे दिसत नाही.

वसई विरार शहराची लोकसंख्या आज 18 लाखांहून अधिक आहे. लोकांना सुविधा पुरवण्याची आश्वासन पोकळ निघालीत. 2015च्या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी मत मागण्यापूर्वी लोकांना अश्वासन दिले. 90 दिवसांत वसई विरारला पुरेसे पाणी नाही मिळाले तर वसई विरारचे महापौर राजीनामा देतील. पण वसई विरार महानगर पालिकेवर पाच वर्षांत दुसऱ्या टम महापौरांची निवड सुध्दा झाली पण वसई विरार शहरामधील नागरिकांची पाण्याची समस्या कायम आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version