धावत्या ट्रेनमधून तरुणीला बाहेर फेकलं; विरार लोकलमधील धक्कादायक घटना

धावत्या ट्रेनमधून तरुणीला बाहेर फेकलं; विरार लोकलमधील धक्कादायक घटना

जय महाराष्ट्र न्यूज, विरार

 

19 वर्षाच्या तरुणीला धावत्या लोकलमधून फेकल्याची घटना विरारमध्ये घडली आहे. कोमल चव्हाण असं या तरुणीचं नाव असून ती गंभीर जखमी झाली आहे.

 

नालासोपाऱ्याला जात असताना एक व्यक्ती डब्यात चढला आणि कोमलकडे पैसे मागू लागला. कोमलनं पैसे देण्यास नकार दिल्याने या व्यक्तीनं कोमलला धावत्या ट्रेनमधून बाहेर ढकलून दिलं आणि स्वत: खाली उतरला.

 

कोलमवर सध्या विरारमधील वल्लभ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा प्रकार घडताना प्लॅटफॉर्मवर एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून अद्यापही आरोपी फरार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version