NEET घोटाळ्यात नवा ट्विस्ट! ‘तुम्ही एम्सला जाणार’ म्हणत विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडतानाचा शिवराज मोटेगावकरचा व्हिडिओ व्हायरल

NEET पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी शिवराज मोटेगावकर यांचा विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
NEET घोटाळ्यात नवा ट्विस्ट! ‘तुम्ही एम्सला जाणार’ म्हणत विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडतानाचा शिवराज मोटेगावकरचा व्हिडिओ व्हायरल

देशभरात गाजत असलेल्या NEET-UG परीक्षा घोटाळ्याचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी नवी धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि लातूरमधील RCC कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर याचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये शिवराज मोटेगावकर क्लासमधील विद्यार्थ्यांसमोर तांब्याच्या भांड्यातील पाणी गवताच्या सहाय्याने शिंपडताना दिसत आहेत. याचवेळी “तुम्ही एम्समध्ये जाणार” असे बोलताना त्यांचा आवाजही ऐकू येतो. त्यामुळे या प्रकाराकडे अनेकांनी आश्चर्याने पाहिले असून सोशल मीडियावर या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत.

NEET पेपरफुटी प्रकरणात सध्या केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) तपास सुरू आहे. या प्रकरणात मोटेगावकर यांची चौकशी सुरू असतानाच त्यांचा हा व्हिडिओ समोर आल्याने प्रकरण अधिक चर्चेत आले आहे. काहीजणांनी या कृतीला अंधश्रद्धा किंवा तंत्र-मंत्राशी जोडले असून विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर अशा गोष्टींचा परिणाम होत होता का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास केवळ कोचिंग क्लासपुरता मर्यादित नसून काही डॉक्टर, पालक आणि विद्यार्थ्यांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे NEET घोटाळ्याचे जाळे आणखी मोठे असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे आता शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा कोचिंग क्लास संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विद्यार्थ्यांना यशाची हमी देण्याच्या नावाखाली काही ठिकाणी मानसिक दबाव, अंधश्रद्धा किंवा चुकीच्या पद्धतींचा वापर होत आहे का, याबाबतही चर्चा रंगू लागली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version