नांदेडमध्ये दोन गटात राडा

नांदेडमध्ये दोन गटात राडा

नांदेड, १६ मे २०२३, प्रतिनिधी :राज्यात अकोला आणि शेगावात हिंसाचार घडत असतानाच आता नांदेड जिल्ह्यातील किनवट शहरात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. हळदीच्या समारंभात लावण्यात आलेल्या गाण्याच्या आवाजावरून दोन सामुदायातील गटामध्ये वाद झाला असून तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत १ व्यक्ती गंभीर जखमी झाला असून अन्य व्यक्ती किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी दोन्ही गटामधील ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नांदेडमधील किनवट शहराच्या गंगानगरात रविवारी रात्री उशिरा शहराच्या गंगानगरात एका लग्न सोहळ्यात गाणे लावण्याच्या कारणावरून दोन समुदायातील गटात वाद झाला. देवाचे गाणे का वाजवता, असा जाब विचारत इस्लामपुरा येथील पाशा मिस्त्री व इतर ९ जणांनी जिवे मारण्याची धमकी देत दगडफेक केली. तसेच लाठ्या व स्टील रॉडने वरातीत नाचणाऱ्यांना मारहाण केली. या मारहाणीत बापूराव यलप्पा धोत्रे याचे डोके फुटले. त्याला अधिक उपचारासाठी आदिलाबादला हलविण्यात आले. तर मारूती धोत्रे यालाही मुकामार बसला. शिवाय,या मारहाणीत इतर किरकोळ जखमी झाल्याची फिर्याद मारूती धोत्रे याने पोलिसात दिली. तर घटनेप्रकरणी दोन्ही गटातील एकूण ११ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शहरांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, अकोला, शेवगाव आणि त्यानंतर आता नांदेडमध्ये दोन गटात हाणामारी झाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा सुव्यवस्थेचा प्रन्श ऐरणीवर आला आहे. तसेच, हिंसाचाऱ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version