जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अंकिता जंगम अत्याचार प्रकरणी विधानसभेत प्रश्न उपस्थित केलाय. यासंदर्भातील लक्षवेधीवर बोलतांना त्यांनी सरकारला चांगलेच फैलावर घेतलं.
या प्रकरणामध्ये पोलिसांनी उदासीनता बाळगल्याचे दिसून येत असताना कोणावरही कारवाई केली जात नाही, असे ते म्हणाले.
जिल्हा पोलीस अधिक्षक नाही तर किमान पोलीस निरीक्षकाला तरी निलंबित करण्याची इच्छाशक्ती सरकारने दाखवली पाहिजे, अशी मागणी विखे पाटील यांनी लावून धरली.
सरतेशेवटी संबंधित पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा गृहराज्य मंत्र्यांनी केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.