विराट कोहलीच्या कार्यक्रमाला विजय मल्ल्याची हजेरी!

विराट कोहलीच्या कार्यक्रमाला विजय मल्ल्याची हजेरी!

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

बँकांना तब्बल नऊ हजार कोटींना चुना लावून पळालेला विजय मल्ल्या लंडनमध्ये बिनधास्त फिरतोय. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या चॅरिटी कार्यक्रमात विजय

मल्ल्यानेही हजेरी लावली.

 

मानवी तस्करी रोखण्यासाठी काम करणाऱ्या जस्टिस अँड केअर या संघटनेतर्फे रविवारी लंडनच्या एसएसी मैदानात विराट कोहलीच्या उपस्थितीत एका चॅरिटी कार्यक्रमाचं

आयोजन करण्यात आलं होते.

 

या कार्यक्रमाला टीम इंडियाच्या खेळाडूंसह अनेक मोठ्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. या चॅरिटी कार्यक्रमाचा व्हिडीओ समोर आला आहे.

 

या व्हिडीओमध्ये विजय मल्ल्या काळ्या रंगाच्या गाडीतून उतरुन कार्यक्रमाच्या ठिकाणी जाताना दिसत आहे.

 

आता विजय मल्ल्याने विराट कोहलीच्या कार्यक्रमाला जाहीरपणे हजेरी लावल्याने बीसीसीआयची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version