कर्जबुडव्या विजय मल्ल्याविरोधात आज लंडन कोर्टात सुनावणी

कर्जबुडव्या विजय मल्ल्याविरोधात आज लंडन कोर्टात सुनावणी

वृत्तसंस्था, ब्रिटन

 

कर्जबुडव्या विजय मल्ल्याविरोधात आज लंडन कोर्टात सुनावणी होणार आहे. भारतातल्या बँकांचे 9 हजार कोटी बुडवून विजय मल्ल्या ब्रिटनला पळाला. भारतानं केलेल्या तक्रारीनंतर एप्रिल महिन्यात स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर त्याला तासाभरात जामीन दिला होता आणि सोडण्यात आले होते.

 

सध्या विजय मल्ल्या जामिनावर मुक्त आहे. आज कर्जबुडव्या विजय मल्ल्याविरोधात लंडन कोर्टात सुनावणी होणार आहे. 13 मे रोजी ही सुनावणी होणार होती मात्र ती महिन्याभरासाठी पुढे ढकलण्यात आली. विजय मल्ल्या जेव्हा लंडनला पळाला तेव्हा भारताने ब्रिटनला विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पण प्रकरणी औपचारिक अर्ज केला होता.

 

फेब्रुवारी महिन्यापासून प्रत्यार्पणासाठी पाठपुरावा केल्यावर विजय मल्ल्याला 8 एप्रिलला अटक करण्यात आली होती. डबघाईला गेलेल्या किंगफिशर या विमान कंपनीचा मालक विजय मल्ल्या मार्च 2016 मध्ये 9 हजार कोटींचे कर्ज बुडवून देशाबाहेर पळाला होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version