मुंबई, पुण्यासह १० जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

मुंबई, पुण्यासह १० जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून मान्सून राज्यभरात सक्रीय झाला आहे. मराठवाडा, कोकण, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळं गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात केली आहे. सतत रिमझिम पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. गेल्या २४ तासांत मराठवाडा आणि कोकणासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे. धुळे, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांतील अनेक भागांमध्ये पावसाने धुंवाधार बॅटिंग केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. बुधवारी दुपारनंतर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर मध्यरात्री देखील काही भागांमध्ये पाऊस झाल्याची माहिती आहे.

दुसरीकडे कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं शेतकरी सुखावला आहे. परिणामी राज्यातील अनेक भागांमध्ये पेरणीच्या कामांना वेग आला आहे. राज्यातील काही भागांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले होते.

मुंबईसह ठाणे आणि उपनगरांच्या भागामध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळं नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड, पैठण आणि वैजापूर या तालुक्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. परभणीतील मानवत, जिंतूर आणि गंगाखेडमध्येही मुसळधार पाऊस झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील अनेक ओढ्यानाल्यांना पूर आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मध्यरात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं होतं. विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version