आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन; शेतकरी कर्ज, खड्डे अशा विविध मुद्यावर विरोधकांकडून सरकारची कोंडी होण्याची शक्यता

आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन; शेतकरी कर्ज, खड्डे अशा विविध मुद्यावर विरोधकांकडून सरकारची कोंडी होण्याची शक्यता

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

 

शेतकरी कर्ज, खड्डे तूर खरेदी, मंजुळा शेट्ये प्रकरण, समृद्धी महामार्ग यासारख्या विषयांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.

 

विरोधकांमध्येच फूट पडल्याचं चित्र आहे. त्यामुळे विरोधकांची अधिवेशनात भूमिका कशी असेल, हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

 

तसेच एकीकडे राष्ट्रपती निवडणूकीत अदृश्य हात मिळाल्याने भाजपच्या गोटात आनंद आहे त्यामुळे आता शिवसेना अधिवेशनात काय भूमिका घेते याकडे ही लक्ष

लागले आहे.

 

दरम्यान, या अधिवेशनात सरकारकडून 14 विधेयकं मांडण्यात येणार आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version