विधान परिषद पोटनिवडणूक; मते फुटणार नसल्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा दावा

विधान परिषद पोटनिवडणूक; मते फुटणार नसल्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा दावा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

विधान परिषदेच्या एका जागेसाठी उद्या पोटनिवडणूक होतेय. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यानं ही जागा रिक्त आहे.

भाजपाचे प्रसाद लाड रिंगणात असून त्यांना शिवसेना व मित्रपक्षांचा पाठिंबा आहे. तर, काँग्रेसचे दिलीप माने निवडणूक लढवित असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचा पाठिंबा आहे. संख्याबळ ध्यानी घेता युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांचं पारडं जड आहे.

विधानसभेत भाजपाचे 122, शिवसेनेचे 63, काँग्रेसचे 42, राष्ट्रवादी 41, शेकाप आणि बहुजन विकास आघाडीचे प्रत्येकी 3, अपक्ष 7 एमआयएमचे 2 तर; सपा, रासपा, मनसे आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि भारिपचे प्रत्येकी एक आमदार आहेत.

उमेदवाराला जिंकण्यासाठी 145 मतांचा आकडा पार करावा लागणार आहे. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या निवडणुकीत भाजपानं मिशन 200चं लक्ष्य ठेवलंय. लाड हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे असल्याने विरोधकांची काही मते फोडण्यात त्यांना यश मिळू शकते, असा अंदाज आहे. मत फुटणार नाहीत, असा दावा दोन्ही काँग्रेसनं केलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version