Pimpri-Chinchwad viral video : पालकांची बेफिकिरी? चिमुकल्याच्या हातात दिलं रिक्षाचं स्टेअरिंग, मुख्य रस्त्यावर….

पिंपरी चिंचवड शहरात लोकांच्या आणि स्वतःच्या जीवाशी खेळणारा एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Pimpri-Chinchwad viral video : पालकांची बेफिकिरी? चिमुकल्याच्या हातात दिलं रिक्षाचं स्टेअरिंग, मुख्य रस्त्यावर….

पिंपरी चिंचवड शहरात लोकांच्या आणि स्वतःच्या जीवाशी खेळणारा एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक सहा-सात वर्षाचा अल्पवयीन चिमुकला वाकड परिसरातील फोनिक्स मॉल समोरील मुख्य रस्त्यावर ऑटो रिक्षा चालवत असतानाचा विडियो सध्या पिंपरी चिंचवड शहरात वायरल होत आहे. या विडियोमध्ये चिमुकला मुलगा ऑटो रिक्षा चालवत असताना आपण पाहू शकतो.

तसेच त्याचे वडील ऑटो रिक्षा मागील सीटवर बसून प्रवास करत आहेत अस आपल्याला या विडियोच्या माध्यमातून दिसून येत आहे. चिमुकला मुलगा ऑटो रिक्षा चालवत असताना जर एखादा अपघात झाला तर याला जबाबदार कोण असणार? असा प्रश्न आता सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकर विचारत आहेत. तर चिमुकला मुलगा शहरातील मुख्य मार्गावर अशाप्रकारे ऑटो रिक्षा चालवत असताना शहरातील वाहतूक पोलीस काय करत होते ? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version