ज्येष्ठ मराठी विनोदी अभिनेते विजय चव्हाण काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ मराठी विनोदी अभिनेते विजय चव्हाण काळाच्या पडद्याआड

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अभिनेते विजय चव्हाण यांचं मुलुंडच्य़ा फोर्टीस रुग्णालयामध्ये निधन झालं. मराठी रंगभुमीची ‘मोरुची मावशी’ काळाच्य़ा पडद्याआड गेले.

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी होते. दरम्यानच्या काळात त्यांची तब्येत सुधारली होती. पण पुन्हा एकदा त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यावेळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

वयाच्या ६३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीतील तारा निखळल्याची भावना व्यक्त करण्यात येतेय. 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version