का रुसली सेलिब्रिटींची चिमणी

का रुसली सेलिब्रिटींची चिमणी

मायक्रोब्लॉग्गिंग साईट ट्विटरने आपल्या वापरकर्त्यांना मोठा झटका दिलाय. आज सकाळपासून ट्विटरने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते राजकारणातील दिग्गजांपर्यंत अनेकांच्या ट्विटर अकाऊंटवरून व्हेरिफाईड ब्ल्यू टिक हटवली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाल्यात.

काही महिन्यांपूर्वी ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी 20 एप्रिलपासून सर्व लेगसी व्हेरिफाइड अकाऊंट्सवरून ब्ल्यू टिक हटवली जाईल आणि ती मिळवण्यासाठी त्यांना दर महिन्याला ठराविक रक्कम मोजावी लागणार असे जाहीर केले होते. त्यानुसार गुरुवारी रात्री 12 वाजल्यापासूनच बऱ्याच व्हेरिफाइड अकाऊंट्ची ब्लु टिक गायब झाली. यात शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, हृतिक रोशन, अनुष्का शर्मा ,विराट कोहली, योगी आदित्यनाथ आणि राहुल गांधी यांचा ही समावेश आहे.आता या यूजर्सना ब्ल्यू टिक हवा असेल तर त्याला ट्विटरवर ब्ल्यूचे सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल. त्यासाठी त्यांना दरमहा 900 रुपये मोजावे लागणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version