इंधनाची होणारी दरवाढ व वाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर 20 ते 25 टक्क्यांनी वधारले आहेत. एपीएमसी मार्केटमध्ये जरी भाज्यांचे दर स्थिर असले तरी वाहतूक खर्चात झालेली वाढ तसेच येणारे सणासुदीचे दिवस यामुळे भाज्यांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. मागणी वाढत असल्याने किरकोळ बाजारातील भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
किरकोळ बाजारातील आजचे दर
भाजीपाला. प्रति किलो दर
वांगी – रु. 60 -65
दोडका – रु. 60
कार्ली – रु. 50 – 60
शेवगा रु. 80 – 90
कोबी – रु. 40
फ्लॉवर – रु. 50
गाजर – रु. 50
काकडी – रु. 50
वाटाणा – रु. 100 – 120.
टोमॅटो – रु. 50
गवार – रु. 80
भेंडी – रु. 60
शिमला मिरची – रु. 60
फरसबी – रु. 80 – 90
पालेभाजी
मेथी – रु. 30
पालक – रु. 20
चवळी – रु. 20
कोथिंबीर – रु. 30
महिनाभरापूर्वी 40 ते 50 रुपये प्रतिकिलो असणारी भाजी आज 60 ते 70 रुपए किलो दराने विकली जात आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात झालेल्या या दर वाढीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला असून महिन्याचा बजेट पूर्णतः कोलमडला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.