जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
नवी मुंबईजवळ अरुणाचल इमारतीला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 20 मजली उंच असलेली ही इमारत अनेक कमर्शिल आणि रिअल इस्टेटच्या कामाचे ठिकाण आहे.
या अपघातात कोणत्याही प्रकारची जिवीतहानीची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र, काही प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग नियंत्रणासाठी त्यांचे शर्थिचे प्रयत्न सुरु आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.