तुंगारेश्वर धबधब्यात बुडून दोघांचा मृत्यू

तुंगारेश्वर धबधब्यात बुडून दोघांचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज , वसई

 

वसईतील तुंगारेश्वर धबधबा पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षण ठरतो.

 

पावसाळ्यात पर्यटकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या तृंगारेश्वर धबधब्यात निसर्गाचा आनंद लुटण्यास आलेल्या दोघांना आपला जिव गमवावा लागला आहे.

 

शुक्रवारी मुंबई विलेपार्ले येथील 9 विद्यार्थ्यांचा ग्रुप येथे पोहायला आला होता. त्यामधील 2  तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.

 

तब्बल 20 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या दोघांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत.

 

 

शवविच्छेदनासाठी दोन्ही मृतदेह मुंबईच्या कामा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

 

 

दरम्यान हे तरुण मद्यपान करुन आल्याची माहिती स्थानिक पोलिस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version