जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
पुरोगामी महाराष्ट्राला लाजीरवाणी घटना मुंबई जवळच्या विरारमध्ये घडलीय. अकरा वर्षाच्या पोटच्या मुलीला बरं करण्यासाठी आईनं अघोरी उपचार करुन तिचं आयुष्यच संपवलंय.
मुलीच्या पोटात दुखत होतं, शौचास होतं नव्हतं. म्हणून आईने तिच्यावर अघोरी उपचार केले. पीडित मुलीच्या आईच्या अंगात आलं आणि ती आपल्या मुलीवर उपचार करु लागली.
मुलीला जमिनीवर पाडलं. पोटावर बसून आईने अमानवीपणे तिच्या तोंडात हात टाकून उपचार करण्याचा प्रयत्न केले. मात्र यात त्या निष्पाप मुलीचा मृत्यू झाला.विरार पूर्वेकडील मनवेलपाडा इथे 18 डिसेंबर रोजी ही घटना घडली.
धक्कादायक म्हणजे मृत मुलीची मावशी आणि वडिलांनीही मदत केली. दरम्यान विरार पोलिसांनी सानियाचे वडील, आई आणि मावशीला अटक करुन त्यांच्याविरोधात हत्या, पुरावा नष्ट करणं यासारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.