नाशिकच्या अशोक खरातचं प्रकरण ताजे असतानाच आता वसईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वसई मधील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यने पुण्यातील महिलेवर अत्याचार केले आहेत. मी महादेवाचा अवतार आहे तू माझी पार्वती म्हणून महिलेवर पुण्यात आणि वसई मध्ये हॉटेलमध्ये केला अत्याचार केला आहे. 35 वर्षे महिलेची ओळख आमची वसई फाउंडेशनच्या माध्यमातून ऋषिकेश वैद्य यांच्यासोबत झाली होती. फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर अध्यात्माचा फायदा घेत या महिलेवर ऋषिकेश वैद्य यांनी लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार केली आहे.
2023 मध्ये सुरुवातीला पुण्यातील मांजरी परिसरात एका लॉजवर अत्याचार केला त्याचेच फोटो काढून ब्लॅकमेल करण्यात आलं. 2025 ला ब्लॅकमेल करून वसई मध्ये एका लॉजवर या महिलेवर अत्याचार केला अशी तक्रार देण्यात आली. वसई मधील माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र सुरुवातीला गुन्हा पुण्यात घडल्याने मांजरी पोलीस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आला आहे. अशोक खरात प्रकरणानंतर महिलेने हिम्मत करून या महिलेने आपल्या पतीला फसवून अत्याचार केल्याचे सांगितल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.