Vande Bharat Train: सोलापूर-मुंबई वंदे भारत ट्रेनला अपघात, अचानक एक डब्बा रूळावरून घसरला अन्….

मुंबईवरुन सोलापूरकडे जाणाऱ्या रेल्वेचा कोच नं सी 15 रुळावरून घसरल्याची माहिती समोर आली आहे. 
Vande Bharat Train: सोलापूर-मुंबई वंदे भारत ट्रेनला अपघात, अचानक एक डब्बा रूळावरून घसरला अन्….

मुंबई- सोलापूर वंदे भारत ट्रेनला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आरामदायी प्रवास म्हणून वंदे भारतला मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसत आहे. मात्र आज या वंदे भारत ट्रेनला अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबईवरुन सोलापूरकडे जाणाऱ्या रेल्वेचा कोच नं सी 15 रुळावरून घसरल्याची माहिती समोर आली आहे. 

पुणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर 3 वर ट्रेन येत असताना हा अपघात झाला, त्यामुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. मात्र, ट्रेनमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. या कोचमधील सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांना दुसऱ्या रेकमध्ये हलविण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

ट्रेन नंबर 22225 मुंबई ते सोलापूर Vande Bharat Express ही गाडी पुणे स्थानकात सायंकाळी सुमारे 7.30 वाजता प्लॅटफॉर्ममध्ये प्रवेश करत असताना डायमंड क्रॉसिंगवर चौथ्या डब्याची एक ट्रॉली घसरली. दरम्यान, वंदे भारत ट्रेनचा कोच रुळावरुन घसरल्याची ही पहिलीच घटना आहे, यापूर्वी वंदे भारत ट्रेन अचानक बंद पडल्याने दुसऱ्या इंजिनने तिला नेण्यात आलो होते.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version