‘वंदे भारत’ आजपासून कोकणात

‘वंदे भारत’ आजपासून कोकणात

पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. मडगाव रेल्वे स्थानकावर वंदे भारत गाडीचे उद्घाटन केलं. एकाच दिवशी ५ ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचे लोकार्पण करण्यात आले. एकूण २३ ‘वंदे भारत’ भारताच्या सेवेत आल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकाच दिवशी पाच वंदे भारत एक्स्प्रेसचं लोकार्पण केलं… नरेंद्र मोदी भोपाळ येथील कार्यक्रमातून पाच वंदे भारत एक्स्प्रेसचं लोकार्पण केलं. हिरवा झेंडा दाखवला. रांची-पटना वंदे भारत एक्स्प्रेस, धारवाड-केएसआर बंगळुरु आणि मडगाव-मुंबई या तीन वंदे भारत एक्स्प्रेसचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुभारंभ केला.

ह्या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माजी मुख्यमंत्री आणि आमदार दिगंबर कामत, राज्य पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई, पर्यटन मंत्री रोहन खुंटे, गोव्याचे खासदार फ्रॅन्सिक्स्को आणि महाराष्ट्रातून सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित असणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version