गेल्या काही महिन्यांपूर्वीच वंदे भारत एक्स्प्रेसचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. लांबच्या प्रवासासाठी सुरु झालेली या वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांकडून पसंती मिळत आहे. दरम्यान, मध्यप्रदेशमध्ये वंदे भारतच्या बॅटरी बॉक्सला आग लागल्याची घटना घडली आहे.
मध्य प्रदेशच्या भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या डब्याला सोमवारी सकाळी आग लागली. गाडी पूर्वी हबीबगंज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राणी कमलापती स्थानकावरून नवी दिल्लीतील निजामुद्दीनच्या दिशेने निघाली तेव्हा एका डब्याला आग लागली. कुरवई स्थानकाजवळील कोच क्रमांक १४ मध्ये बॅटरीमध्ये ठिणगी पडल्याने ही आग लागली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
राणी कमलापती स्थानकावरुन निजामुद्दीनला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनला आग लागली होती. कोचच्या बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचे म्हटलं जात आहे. या आगीतनंतर ट्रेनच्या सी-१४ या कोचमध्ये बसलेल्या ३६ प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले आहे. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून ही आग आटोक्यात आणली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.