वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध, नगरसेवकाला मारहाण

वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध, नगरसेवकाला मारहाण

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची श्रद्धांजली सभा औरंगाबाद महानगरपालिकेत आयोजित केली होती. या सभेला एमआयएमच्या नगरसेवकाने विरोध केल्यानंतर भाजपाच्या नगरसेवकांनी बेदम मारले आहे. आज शुक्रवारी दुपारी विशेष सभेत ही घटना घडली आहे.

औरंगाबाद महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावाला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या एका नगरसेवकाला भाजप-शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहात तुडवून मारले.
 
 
सय्यद मतीन असं या नगरसेवकाचं नाव आहे. शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी अक्षराक्षः चपलेने आणि लाथा बुक्क्याने मारहाण करीत सभागृहाबाहेर काढले.
 
आज औरंगाबाद महापालिकेत समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा विषय महापौरांनी घेतला.
 
वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित चित्रफित सभागृह दाखविण्यात आली. त्यानंतर एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी श्रद्धांजली अर्पण करण्याच्या ठरावाचा निषेध केला. त्यामुळे भाजपचे सदस्य संतप्त झाले.
 
राज वानखेडे, प्रमोद राठोड, माधुरी अदवंत, रामेश्वरभादवे यांनी मतीन यांच्यावर हल्ला चढवला. मतीनला अक्षरक्षः खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. माधुरी अदंवत यांनी चपलेने मारले. त्यानंतर सभागृहात त्याचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव पारित करण्यात आला.
 
सभागृहात हा प्रकार झाल्यानंतर महापालिकेबाहेरही एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयासमोर भाजपा संघटन मंत्र्यांच्या गाडीची तोडफोड करून चालकाला मारहाण केली. त्यांनतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलाय. 

निरोप एका युगाला…

वाजपेयींना अखेरचा निरोप – Pics

वाजपेयींच्या अंत्यदर्शनाला आलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण…

वाजपेयींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मानसकन्या नमिता यांनी दिला मुखाग्नी

वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध, नगरसेवकाला मारहाण

राज ठाकरेंची व्यंगचित्राद्वारे अटलजींना श्रद्धांजली…

जाणून घ्या वाजपेयींच्या संपत्तीबद्दल…

वाजपेयी यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित…

वाजपेयींचे मराठी प्रेम

वाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल…

अशुभ ’13’ अंकाशी वाजपेयींचं खास नातं

वाजपेयींच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार…

वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील 5 निर्णायक घटना!

भारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर…

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द…

अटलबिहारी वाजपेयींसाठी देशभरात प्रार्थना, देशातील सर्व नेते एम्समध्ये दाखल…

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version