Vaijapur Accident: कावड यात्रेला जाताना मोठा अपघात! 20 भाविकांचा टेम्पो पलटी; वैजापूरमध्ये खळबळ

वैजापूर तालुक्यात कावड यात्रेसाठी निघालेल्या 20 भाविकांचा टेम्पो लाडगाव-वांजरगाव रस्त्यावर पलटी झाला.
Vaijapur Accident: कावड यात्रेला जाताना मोठा अपघात! 20 भाविकांचा टेम्पो पलटी; वैजापूरमध्ये खळबळ

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात रविवारी सकाळी कावड यात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या टेम्पोचा अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली. लाडगाव-वांजरगाव मार्गावर हा अपघात घडला. टेम्पोमध्ये सुमारे 20 भाविक प्रवास करत होते. अपघातात काही भाविक जखमी झाले असून त्यांना तातडीने वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही वांजरगाव येथून नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथे असलेल्या पिनाकेश्वर अर्थात मोठा महादेव मंदिराच्या दर्शनासाठी कावड यात्रा निघाली होती. यात्रेतील भाविक टेम्पोमधून प्रवास करत असताना अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्यावर पलटी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: Maratha Protest : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस; राज्य सरकारचे चार शिलेदार भेटीसाठी येण्याची शक्यता, तोडगा निघणार?

अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी भाविकांना वाहनातून बाहेर काढून रुग्णालयात पोहोचवण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र काही भाविकांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, जखमी भाविक हे कन्नड तालुक्यातील विटा औराळा गावातील असल्याचे समजते. रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

हेही वाचा: Abhijeet Dipke On Sonam Wangchuk : "अविश्वास कुठे दाखवला" वांगचुक यांच्या मोठ्या विधानानंतर दीपकेंची रोखठोक प्रतिक्रिया

अपघाताची माहिती मिळताच वीरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पंचनामा सुरू केला आहे. तसेच टेम्पो पलटी होण्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. रस्त्याची स्थिती, वाहनाची अवस्था आणि चालकाचे नियंत्रण यासह सर्व बाबींची चौकशी केली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version