महिला तहसीलदारावर डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

महिला तहसीलदारावर डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

वाळु माफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. बुधवारी बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या तहसिलदार भारती सागरे यांना वाळूमाफीयांनी चक्क डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केलाये.

पारनेरमधील कुकडी नदीपात्रातून काही लोक बेकायदा वाळू उपसा करत असल्याची  माहिती भारती यांना मिळाली आणि त्या घटनास्थळी जाऊन वाळूमाफियांना रोखण्याचा प्रयत्न केला.

मात्र, वाळू माफियांनी त्यांना घेरून त्यांच्यावर डिझेल टाकलं आणि त्यांना जाळण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी पाच वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

या प्रकरणाचा सपूर्ण तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सुपूर्द करण्यात आलाय. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version