जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
विवोनं आपल्या ग्राहकांना नव्या वर्षाची सुरुवात खास व्हावी यासाठी काही नवनव्या ऑफर्स आणल्या आहेत. इतर कंपन्यांच्या या स्पर्धेत विवोनं मोबाइल कंपनीने देखील उडी मारली आहे.
विवोनं आपला स्मार्टफोन विवो V7वर तब्बल 2000 रुपयांची सूट दिली आहे. नोव्हेंबर महिन्यातच लाँच झालेल्या या स्मार्टफोनची किंमत 18,990 रुपये होती. आता फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर 16,990 रुपयात खरेदी करता येणार आहे.
पाहून घ्या विवो V7 स्मार्टफोनचे फीचर्स
विवो V7मध्ये 5.7 इंच स्क्रीनचा असेल
रेझ्युलेशन 1440×720 पिक्सल आहे.
1.8Ghz स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर देण्यात आला आहे.
4 जीबी रॅमचा, 32 जीबी इंटरनल मेमरी, एसडी कार्डनं ती 64 जीबी पेक्षा वाढवता येईल.
24 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा, 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा.
यामध्ये विवो फेस फीचरही आहे. ज्याने तुम्ही आपल्या चेहऱ्यानं स्मार्टफोन अनलॉक करु शकतात.
स्मार्टफोनची बॅटरी 3000 mAh आहे.
विवो स्मार्टफोन हा त्याच्या उत्कृष्ट कॅमेरा आणि स्पीकर साठी ओळख ओळखला जातो. या तसेच याच्या रिअर बॉडीवर फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.