विज्ञानाचा चमत्कार! देशातील पहिलं गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी

विज्ञानाचा चमत्कार! देशातील पहिलं गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

देशातील पहिली गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पुण्यातील गॅलॅक्सी केअर हॉस्पिटलमध्ये गुरुवारी यशस्वीरित्या पार पडली. सोलापुरातील 21 वर्षीय तरुणीच्या शरीरात तिच्याच आईचे गर्भाशय प्रत्यारोपित करण्यात आलं.

 

तब्बल 9 तास ही अत्यंत गुंतागुंतीची मानली जाणारी ही शस्त्रक्रिया चालली होती. डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या नेतृत्वाखालील 12 निष्णात डॉक्टरांच्या टीमने हे प्रत्यारोपण यशस्वी केलं.

 

आईच्या शरीरातून गर्भाशय काढण्यासाठी सुमारे 4 तासांचा कालावधी लागला. त्यानंतर गर्भाशय रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यात आलं. रात्री 9.15 वाजण्याच्या सुमारास प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडलं. गर्भाशयदाती आणि प्रत्यारोपण करण्यात आलेली रुग्ण सुखरुप आहे. रुग्णाला 24 तास देखरेखीखाली ठेवण्यात आलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version