होळीसाठी घरीच तयार करा नैसर्गिक रंग

होळीसाठी घरीच तयार करा नैसर्गिक रंग

वृत्तसंस्था, मुंबई

होळी आली की रंगांची उधळण होते. लाल, गुलाबी, पिवळा असे अनेक रंग उधळले जातात. मात्र, या रंगांचा आपल्या त्वचेवर खूप वाईट परिणाम होते. सध्या बाजारपेठेत रासायनिक रंग मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले पाहायला मिळतात. मात्र, या रंगाच्या वापराने अनेकदा त्वचेचे रोग होण्याची शक्यता असते. हे रंग डोळ्यात गेले तर डोळ्याला इजा होण्याची खूप जास्त शक्यता असते.

मात्र, ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यांवर आजही नैसर्गिक रंगाची होळी खेळली जाते. “पळस” या वृक्षाच्या फुलांपासून हा रंग तयार केला जातो. या फुलांना बारीक करून त्यात गरम पाणी टाकले जाते व काही क्षणातच हा रंग तयार होतो. हा रंग नैसर्गिक असल्याने त्याचा दुष्परिणाम देखील होत नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version