उर्वशी पोझ द्यायला गेली, आणि…

उर्वशी पोझ द्यायला गेली, आणि…

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई

 

उर्वशी रौतेला बॉलिवूडमध्ये सध्या आपल्या लूक्स आणि स्टाइलमुळे चांगलीच प्रसिद्ध होत आहे. तिच्या अनेक फोटोंमुळे आणि व्हिडिओंमुळे तिच्या फॅन्सच्या संख्येतही वाढ होतेय.

मात्र यावेळी असंच स्टायलीश पोषाखात फोटोशूट करत असताना उर्वशीवर बाका प्रसंग गुदरला.
फोटोशूटदरम्यान ती वेगवेगळ्या पोझ देत होती. मात्र एक पोझ देताना तिचा कसा तोल गेला ते पाहा.

आधीच अरुंद असणारा कठडा आणि त्यात पायात घातलेले हाय हिल्स शूज यांमुळे उर्वशीला तोल सांभाळणं कठीण झालं आणि त्यामुळेच पोझ देता देताच तिचा तोल गेला.

सुदैवाने ती पडली नाही. तिनं कसंबसं स्वतःला सावरलं. मात्र या गडबडीत तिच्या कमरेचा पट्टा मात्र खाली पडला.

 

विशेष म्हणजे या प्रसंगामुळे उर्वशी अजिबात खजिल झाली नाही, तर उलट ती आपल्या धडपडण्यावर मनमोकळेपणाने हसली.
एवढंच नव्हे, तर आपल्या या फजितीचा व्हिडिओदेखील तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.
याचबरोबर ‘अपेक्षा विरुद्ध वास्तव’ अशा अर्थाचं शीर्षक देत फॅन्सना आपल्या 5 वैताग देणा-या मित्रांना टॅग करण्यासाठी सुचवलं आहे.
तिचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर 10 लाखांपेक्षाही जास्त लोकांनी पाहिला आहे.
चाहत्यांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर ‘लाइक’ही केलं आहे.

आपल्याच धडपडण्यावर न लाजता तो व्हिडिओही बिनधास्त शेअर केल्याबद्दल अनेक फॅन्सनी तिचं कौतुक केलंय.
उर्वशीच्या धडपडण्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version