उर्फी जावेद मुंबई पोलीस ठाण्यात हजर

उर्फी जावेद मुंबई पोलीस ठाण्यात हजर

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यात सुरु असलेले शीतयुद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. याच पार्श्वभूमीवर आज उर्फी जावेदला सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली होती. त्यानुसार उर्फी जावेद आंबोली पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे चौकशी करत आहेत.

गेल्या काही दिवसात भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात मोठ्या प्रमाणावर वाद सुरु आहे. उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे म्हटले होते. असला नंगानाच खपवून घेणार नाही, असा थेट इशाराच त्यांनी उर्फी जावेद हीला दिला होता. त्यानंतर उर्फीनेही आपला नंगानाच असाच सुरु राहणार म्हणत त्यांना प्रत्युत्तर दिले होते. चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात मुंबई पोलिसांची भेट घेत तक्रार केली होती.

आता सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस पाठवली आहे. अंबोली पोलिस ठाण्यात उर्फी जावेदची चौकशी होत आहे. पोलिसांनी उर्फीला आज हजर होण्याची नोटीस जारी केली होती. चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेतली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version