केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी मुंबईत

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी मुंबईत

राज्याच्या राजकारणात अत्यंत वेगाने घडामोडी घडत आहेत, राज्यात कधीही राजकीय भूकंप घडू शकतो, अशी परिस्थिती आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजपा प्रवेशामुळं शिंदे गटातील नेते अस्वस्थ झाले आहेत. तसेच अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा असल्यामुळे शिंदे गट व भाजपात धूसफूस सुरु आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदि नाराज असून ते अचानक आपल्या गावी निघून गेले होते. तर मविआतील आघाडीत बिघाडी होत आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. मात्र आत्तापासून सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दरम्यान, जागावाटपांचे समीकरण, नविआतील उमेदवारीचे गणित आत्तापासूनच मांडले जात आहे, तर भाजपात अनेकजणांचे प्रवेश होणार आहेत, दुसरीकडे शिंदे-भाजपात नाराजीनाट्य सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंद नाराज असून, ते गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामुळ या महिन्यात अमित शहा सलग दुसऱ्यांदा मुंबई दौऱ्यावर येत असल्यामुळे राजकीय वर्तुळाच चर्चा रंगत आहेत.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज, रविवारी पुन्हा एकदा मुंबईच्या दौ-यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या १०० व्या भागानिमित्त विलेपार्ले येथे होणाऱ्या कार्यक्रमात शहा है सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मुंबईत एका कौटुंबिक विवाह सोहळ्यासाठी ते येत असल्याचे सांगितले जात असले तरी राजकीय चर्चेला मात्र उधाण आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version