पर्वती परिसरातील एका अनधिकृत मजारीचा विषय सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संदर्भात सोमवारी दत्तवाडी पोलिस स्थानकात पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेता धीरज घाटे यांनी निवेदन दिले आहे. या निवेदनातून या संपूर्ण प्रकाराची तातडीने पोलिस चौकशी करण्याची मागणी केली.
या संपूर्ण प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. तसेच या ठिकाणी अनधिकृतपणे काही घडू नये, यासाठी पोलिसांनी या विषयांत लक्ष घातले पाहिजे आणि योग्य कार्यवाही केली पाहिजे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
याच विषयासंदर्भात मंगळवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि पुणे महापालिकेच्या आयुक्तांनाही निवेदन देण्यात येणार असून, त्यांनाही या विषयात लक्ष घालण्याची मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती धीरज घाटे यांनी समाजमाध्यमावरून दिली आहे.
नागरिकांनी या संदर्भात सध्या शांत राहून पोलिसांना आपला तपास करू द्यावा, अशी सर्वांना विनंतीही त्यांनी समाजमाध्यमवरून केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.