वृत्तसंस्था, नवी दिल्ली
समीर गायकवाड याला जामीन मिळाल्यामुळेच पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाल्याचा खळबळजनक आरोप कॉ. गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांनी केला आहे.
समीर गायकवाड हा कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशय़ित आरोपी आहे. आज लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली.
यावेळी उमा पानसरे बोलत होत्या. समीरला जामीन मिळायला नको होता. समीरच्या जामीनामुळेच चौथी हत्या झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हत्येमागे मोठं षडयंत्र असून तपासांबाबत आजही साशंकता वाटते, असंही उमा पानसरे यावेळी बोलल्या.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.