म्हणून लहान मुलांचं अर्ध मुंडण करुन गळ्यात घातला चपलांचा हार; उल्हसनगरमधील घटना

म्हणून लहान मुलांचं अर्ध मुंडण करुन गळ्यात घातला चपलांचा हार; उल्हसनगरमधील घटना

जय महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर

 

चोरीचा आळ घेत दोन लहान मुलांचं अर्ध मुंडन करुन त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घातल्याची धक्कादायक घटना उल्हासगनरमध्ये घडली.

 

या प्रकरणी दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 5 मधील प्रेमनगर टेकडी परिसरात ही घटना घडली.

 

पठाण नावाच्या दुकानदारानं हे तालिबानी कृत्यं केले. या घटनेनंतर मुलांच्या आईनं पोलिसांत धाव घेत, दुकानदाराविरोधात तक्रार दाखल केली.

 

पोलिसांनी मुलांच्या आईच्या तक्रारीवरुन दुकानदारावर गुन्हा दाखल केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version