बहुचर्चित सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी; उज्ज्वल निकम यांची मागणी

बहुचर्चित सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी; उज्ज्वल निकम यांची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा अंतिम निकाल येत्या शनिवारी म्हणजेच 20 जानेवारीला देण्यात येणाराय. सरकारी पक्षातर्फे अॅड. उज्ज्वल निकम यांनी अंतिम युक्तीवाद करताना दोषी 6 आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केलीय.

दरम्यान जिल्हा सत्र न्यायाधीश आर.आर. वैष्णव हे अंतिम निकाल देणार आहे. 15 जानेवारीला सातपैकी सहा जणांना खून आणि खुनाचा कट रचणे याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं.

औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार नेवासे सत्र न्यायालयात सुरू असलेला खटला नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयात हलविण्यात आला होता. दरम्यान याप्रकरणी आता 20 जानेवारीला आरोपीना शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version