जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर
उजनी धरण 90 टक्क्यांपेक्षा अधिक भरल्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीला पाणी सोडले जाणार असल्याची माहिती
संबंधीत अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. धरणातून पाणी सोडणार असल्याने प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
देण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यासह उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 8 दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे उजनीच्या पाणी साठ्यात वेगाने वाढ
झाली असून 8 दिवसांत धरण 50 टक्के भरले आहे.
मंगळवारी सकाळी 10 वाजता धरण 92 टक्के भरले होते, त्यामुळे कोणत्याही क्षणी उजणीतून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात
येणार आहे. उजनीच्या दोन्ही कालव्यातून आणि बोगद्याद्वारेसुध्दा पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. कालव्याला पाणी सोडून
लाभक्षेत्रातील सर्व ओढे, तळी, तलाव, बंधारे भरून घेतले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
भीमा नदीला पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे प्रशासनाकडून शेतकऱ्यांना आपले शेती पंप, साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा इशारा
देण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.