जय महाराष्ट्र न्यूज, सातारा
अटकेची टांगती तलवार असलेले राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांना अखेर अटक झाली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासाणीसाठी
सिव्हील रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.
आज सकाळी उदयनराजे स्वत: सातारा पोलीस ठाण्यात हजर झाले होते.
उदयनराजेंवर खंडणी आणि मारहाणी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी अर्ज केला होता. मात्र, तो मुंबई उच्च न्यायायलानं फेटाळला. त्यामुळे उदयनराजेंना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
दरम्यान, कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे आणि शिवप्रतिष्ठानने उदयनराजेंना पाठिंबा दिला.
उदनयराजेंना अटक झाल्यास महाराष्ट्र पेटेल असा इशारा शिवप्रतिष्ठानच्या संभाजीराव भिडे गुरुजींनी दिला आहे.
खासदार उदयनराजे भोसलेंच्या अटकेबाबत LIVE UPDATE
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.