साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा 51 वा वाढदिवस

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा 51 वा वाढदिवस

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज आणि राष्ट्रवादी काँग्रेसतील साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा आज 51 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने उदयनराजेंनी वाढदिवसाची जोरदार तयारी केली आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह राज्यातील सर्वच पक्षातील नेते उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, आज उदयनराजेंच्या मतदार संघातील विविध विकास कामांचा शुभारंभ होणार आहे. त्यात साताऱ्याला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणाची उंची वाढविणे, भुयारी गटार योजनेचे भूमिपूजन, पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटर उभारणी प्रारंभ आणि पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन अशा विविध कार्यक्रमांबरोबरच एका मेळाव्याचे आयोजन केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version