जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
न्यायालयाच्या न्यायालयाच्या कारभारावर बोट ठेवणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील चारही न्यायाधीशांचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कौतूक केलंय.
न्यायव्यवस्था ही आंधळी असल्याचं म्हटलं जातं. ती निःपक्षपातीपणाने निर्णय देते म्हणून, तिला आंधळी म्हटले जाते. पण, याच न्याय व्यवस्थेला आंधळी आणि बहिरी करण्याचं काम कोणी करू नये’, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं.
तसंच न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायचा की नाही असा लोकांना प्रश्न पडला असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.