जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईत जास्त पाऊस पडतो. त्याला बीएमसी जबाबदार कशी? असा सवाल उद्धव ठाकरेंनी टीका करणाऱ्यांना केला आहे.
आर.जे. मलिष्कानं पालिकेच्या कारभाराला लक्ष्य करत मुंबई तुला बीएसीवर भरोसा नाय का हे गाणं यूट्यूबवर टाकलं होतं. आणि रातोरात या गाणं लोकप्रिय झालं होतं.
मात्र, गाण्यातून पालिकेवर टीकेची झोड उठवणाऱ्यांना पालिका जबाबदार कशी? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. तसंच संपूर्ण पावसाळ्यात मुंबईला सुरळीत ठेवणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुलुंडमध्ये कालिदास नाट्यमंदिराचं उद्घाटन उदधव ठाकरेंच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.