शिवरायांची अशी बदनामी कोण करणार असेल तर ते खपवून घेणार नाही – उद्धव ठाकरे

शिवरायांची अशी बदनामी कोण करणार असेल तर ते खपवून घेणार नाही – उद्धव ठाकरे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यात मोगलाईसदृश स्थिती राज्यात सध्याची गोंधळाची स्थिती असून जनतेला वेठीस धरणारे निर्णय घेतले जात असल्याची टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे.

भाजपविरोधी वातावरणामुळे तेथे मोदींना 50 सभा घ्याव्या लागल्या. एवढे करूनही तेथे भाजप जिंकले नाही, जिंकण्यासाठी गडबड केली नाही, तर देशात मोदींना थारा नाही, हेच स्पष्ट होईल.

गुजरातमधील विधानसभा निवडणूकीमुळेच मोदी सरकारला जीएसटी दर कमी करावे लागले.

शिवशाही कर्जमाफी योजना असे नाव देऊन शिवरायांची अशी बदनामी कोण करणार असेल तर ते खपवून घेणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

सरकारला कर्जमाफी करण्यासाठी शिवसेनेने भाग पाडले. मात्र, त्यानंतरही कर्जमाफी शेतक-यांपर्यंत पोहोचलेली नाही, हे दुर्दैवी असल्याची खंतही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version