जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कर्जमाफीचे ढोलनगारे वाजले, होर्डिंगबाजी झाली, पण शेतकरी कर्जमुक्त झाला का असा सवाल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय.
शेतकरी अजूनही कर्जमाफीची वाट पाहत रांगेतच उभा आहे आणि सरकारकडून होय, मी लाभार्थीची जाहिरातबाजी सुरू आहे.
तुम्ही लाभार्थी नाहीत म्हणजे देशद्रोही! लाज वाटते या सरकारची अशा कडक शब्दांत उद्धव ठाकरेंनी सरकारवर ताशेरे ओढलेत.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला म्हणजे झालाच पाहिजे. शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही असा जबरदस्त इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.