जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी अखेर आपला संप मागे घेतला आहे.
16 तासानंतर त्यामुळे मुंबईच्या रस्त्यावर बेस्ट धावणार आहेत. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी बेस्ट कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याची
विनंती केली.
मातोश्रीवरच्या या बैठकीत बेस्ट कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. बेस्ट कर्मचाऱ्यांची जबाबदारी आमची आहे असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.
त्यानंतर मग शशांक राव यांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली.
ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. मुंबईकरांना झालेल्या गैरसोयीबद्दल उद्धव ठाकरेंनी
जाहीर दिलगिरीही व्यक्त केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.