‘शिवसेनेचे यज्ञकुंड आजही धगधगतं’- सामनातून विरोधकांना इशारा

‘शिवसेनेचे यज्ञकुंड आजही धगधगतं’- सामनातून विरोधकांना इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भीमा-कोरेगाव प्रकरणाची आग अद्याप विझलेली नाही. ती आग विझवणारा आणि खवळलेल्या समुदायास एका आदेशाने ‘शांत’ करणारा नेता उरलेला नाही, अशा शब्दांत सामना या दैनिकाच्या अग्रलेखातून दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्मृती जागवल्या आहेत.

मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी शिवसेनेचा यज्ञकुंड नुसता चेतवला नाही, तर पंचेचाळीस वर्षे पेटताच ठेवला. आजही तो धगधगता आहे. त्याचे श्रेय शिवसेनाप्रमुखांनाच आहे. त्यांनी ना शिवसेनेत जातीपातीचा विचार केला ना समाजकारण किंवा सत्ताकारण करताना केला.

मात्र, आज महाराष्ट्र जेवढा नाती-जाती-पोटजातींत फाटला आहे तेवढा याआधी कधीच विभागलेला नव्हता. किंबहुना, राज्याच्या सामाजिक एकोप्याच्या अशा काही चिंधडय़ा उडाल्या आहेत की, त्यास ठिगळं लावणेही जिकरीचे झाले आहे, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version