‘आम्ही तटस्थ राहू’ – शिवसेना

‘आम्ही तटस्थ राहू’ – शिवसेना

वृत्तसंस्था, मुंबई

एरवी केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेनेच्या बोटचेप्या वृत्तीचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

वायएसआर काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठरावावर लोकसभेत मतदान झाल्यास आम्ही तटस्थ राहू, अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याचे समजते.

त्यामुळे भाजपाला उठसूट इशारे देणाऱ्या शिवसेनेने पुन्हा एकदा मोक्याच्या क्षणी कच खाल्ल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version